कोविड १९ आजारावरील ‘कोविशील्ड’ या लसीचा पहिला साठा आज पहाटे साडेचार वाजता जिल्ह्यात दाखल झाला आहे. येत्या शनिवारपासून लसीकरणास प्रारंभ होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. विशेष वाहनाने ही लस ठाण्यात आणण्यात आली. उपसंचालक कार्यालयात हा साठा पोहोचविण्यात आला आहे.पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडून ठाणे मंडळासाठी सुमारे १ लाख ३ हजार डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यापैकी जिल्ह्यासाठी ७४ हजार डोस उपलब्ध झाले आहेत. या ठिकाणाहून जिल्ह्यातील २९ निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवली जाणार आहे.