कोरोना विषाणू संदर्भात संशयित व्यक्ती आढळल्यास आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचं महापौरांचं आवाहन

कोरोना विषाणू संदर्भात एखादी संशयित व्यक्ती आढळून आल्यास महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केलं आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सर्वच स्तरातून उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना संदर्भात एखादी संशयित व्यक्ती आढळल्यास महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी २५३७ १०१० अथवा १८०० २२२ १०८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन महापौरांनी केलं आहे. सद्यस्थितीमध्ये काही व्यक्ती ताप, सर्दी, खोकला सारखे आजार दिसून येतात. काही व्यक्ती याकडे दुर्लक्ष करत असून औषधोपचार करण्यास टाळाटाळ करत आहेत. ही बाब अतिशय गंभीर असून दुर्दैवानं हा आजार बळावून अनर्थ घडू नये यासाठी सर्वांनी दक्ष राहून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. किंबहुना अशा प्रकारची व्यक्ती आढळल्यास याबाबतची माहिती महापालिकेस द्यावी असं आवाहन महापौरांनी केलं आहे. याची दखल महापालिकेचे अधिकारी घेतील आणि संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन त्यास योग्य ते मार्गदर्शन करतील आणि आवश्यकता वाटल्यास महापालिकेच्या रूग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करून पुढील उपाययोजना करतील. अशा व्यक्तींची माहिती उपलब्ध करून देणा-या व्यक्तीबाबत पूर्णपणे गोपनियता राखली जाईल असंही महापौरांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading