कोरोना विषाणू संदर्भात अफवा आणि दिशाभूल केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

कोरोना विषाणू संदर्भात अफवा आणि दिशाभूल केल्याप्रकरणी भिवंडी पोलीसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे आणि त्यांच्या पथकानं खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी बाळासाहेब डावखर यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल केला आहे. अरिहंत मॅट्रेसेसच्या मालकांनी कोरोना रेझिस्टंट मॅट्रेसेस यांसदर्भात एका गुजराती दैनिका जाहिरात दिली होती. या मॅट्रेसेसमुळे कोरोना विषाणूला प्रतिबंध होईल अशी समजूत करणारी ही जाहिरात होती. अशा मॅट्रेसेस वूडनझा फर्निचरमध्ये उपलब्ध आहेत असं या जाहिरातीत म्हटलं होतं. याप्रकरणी नारपोली पोलीसांनी आक्षेपार्ह जाहिराती अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading