कोरोनापासून बचावासाठी आवश्यक असलेले एम ९५ चे २० लाख मास्क शासनाला मिळाले आहेत. डॉ. भागवत आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेतर्फे हे २० लाख मास्क देणयात आले आहेत. सध्या कोरोनाचं वातावरण असून विशेषत: वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि कर्मचारी वृंदाला मास्कची विशेष आवश्यकता आहे. त्यातही दुर्गम भागातील डॉक्टर आणि कर्मचा-यांसाठी याची जास्त आवश्यकता असून आता हे मास्क शासनातर्फे दुर्गम भागातील आरोग्य सेवेतील कर्मचा-यांना दिले जाणार आहेत.