महागिरीतील एका कुटुंबानं ईदचा नमाज घरी अदा करून निर्माण केला आदर्श

एकीकडे ईदमुळे निर्माण होणा-या गर्दीबाबत चिंता निर्माण होत असतानाच दुसरीकडे महागिरीतील एका कुटुंबानं ईदचा नमाज घरी अदा करून एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचं वातावरण असल्यामुळं शासनानं उत्सव, सण यांच्यावर काही निर्बंध लादले आहेत. गेली दोन वर्ष बहुतांश सर्व सण या निर्बंधातच साजरे झाले आहेत. सध्या ईदचं वातावरण असून ईदनिमित्त खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. मात्र या गर्दीबाबत चिंता निर्माण होत आहे. असं असतानाच महागिरीतील तारवाडी कुटुंबियांनी आपल्या घरी ईदचा नमाज अदा करून एक आदर्श वस्तुपाठ निर्माण केला आहे. ईद-उल-फित्र म्हणजे रमजान ईद साजरी करताना या कुटुंबानं सकाळचा नमाज घरी अदा केला आणि शिरकुर्माचा आस्वाद लुटला खरंतर सर्वांनी अशा पध्दतीनेच ईद साजरी करायला हवी. कारण कोरोनाची भीती अजूनही सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दिसत आहे असं असताना होणारी ही गर्दी टाळून घरीच नमाज अदा करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading