कासवाची तस्करी करणा-या व्यक्तीस वन विभागानं घेतलं ताब्यात

कासवाची तस्करी करणा-या एका व्यक्तीस वन विभागानं ताब्यात घेतलं आहे. ज्युपिटर हॉस्पिटल शेजारी जय मकवाना, अनिकेत पुरबिया या दोघांना मिळालेल्या माहितीवरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडून २ कासवं जप्त करण्यात आली. एका कापडी पिशवीमध्ये निळ्या रंगाच्या बास्केटमध्ये ही कासवं ठेवण्यात आली होती. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत यांची खरेदी-विक्री आणि त्यांना पाळणं बंदी असताना हे दोघं ही कासवं बाळगून होते. म्हणून पोलीसांनी त्यांच्याकडील कासवं जप्त केली. आता या प्रकरणी वनक्षेत्रपाल अधिक तपास करत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading