अस्मा शेखला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रताप सरनाईक प्रयत्न करणार

मुंबईतील फूटपाथवर राहून दहावी उत्तीर्ण झालेल्या अस्मा शेखने कठीण परिस्थितीवर मात करत यश संपादन केले असून तिच्या मदतीला आमदार प्रताप सरनाईक धावले आहेत. तिला पुढील शैक्षणिक वाटचालीत आवश्यक ते सहकार्य करण्यासह राज्य सरकारकडून हक्काचे घर मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहोत , त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. ९५ ते १०० टक्के गुण मिळवणारे अनेक विद्यार्थी पहायला मिळाले. पण फूटपाथवर राहून कठीण परिस्थितीत संघर्ष करून परीक्षेत ४० टक्के गुण मिळवणा-या अस्मा शेखचे यश अधिक लक्षवेधी आहे. तिचे अभिनंदन करण्यासाठी सरनाईक यांनी फोन करून तिचे विशेष कौतुक केले. अस्मा शेख हिला आवश्यक ते पुढील सर्व सहकार्य करू असं सांगून अस्माला हक्काचे घर मिळावे यासाठी पाठपुरावा करून तिला घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असंही सरनाईक यांनी सांगितलं. तसेच नोकरी मिळवून देण्याचा शब्द सरनाईक यांनी दिला. अस्मा शेखच्या या संघर्षातून सर्व सुखसोयी असतानाही कूरकूर करणा-या विद्यार्थ्यांनी धडा घेण्याची गरज आहे. तिला मार्क्स किती मिळालेत हे महत्वाचे नाही पण या परिस्थितीतही शिक्षण घेण्याची जिद्द तिने मनात कायम ठेवली, प्रयत्न केले हे महत्वाचे असून तिला पुढील वाटचालीत आवश्यक ते सहकार्य करू असे प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading