कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या सामन्यासाठी खासगी हॉस्पिटल आणि क्लिनिकच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोव्हीडचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक असणारी संपूर्ण यंत्रणा, म्यूकरमायकोसिस, लहान मुलाच्या आरोग्याची काळजी, ऑक्सिजन पुरवठा, बेड्स तसेच लसीकरण आदी बाबत शहरातील खासगी हॉस्पिटल आणि क्लिनिकच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आज दूरदृशप्रणालीच्या माध्यमातून एक दिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी काही तज्ञांनी संभाव्य तिसऱ्या लाटेची शंका वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सुसज्ज असून शहरातील खासगी हॉस्पिटल आणि क्लिनिकनी याबाबत सतर्क राहून कोव्हीडची परिस्थिती योग्यरीत्या हाताळावी यासाठी प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण सत्रात शहरातील खासगी हॉस्पिटल आणि क्लिनिकच्या २०० प्रतिनिधींनी दूरदृशप्रणालीद्वारे सहभाग घेतला. या प्रशिक्षण सत्रात लहान मुलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, त्यांच्यावर उपचार कसे करावेत, म्यूकरमायकोसिस आजाराची लक्षणे त्यावरील उपाययोजना, ऑक्सिजनचा उपलब्ध साठा त्याचे नियोजन, नागरिकांच्या आवश्यकतेनुसार शहरातील ऑक्सिजन, आयसीयू बेड्स यांचे नियोजन, मृत्यू प्रमाणपत्र तसेच गरोदर महिलांचे लसीकरण आदी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading