उल्हासनगरमध्ये एका इमारतीत घराचा स्लॅब कोसळल्यानं दोन व्यक्तींना दुखापत

उल्हासनगरमध्ये एका इमारतीत घराचा स्लॅब कोसळल्यानं दोन व्यक्तींना दुखापत झाली आहे. आज संध्याकाळी ६च्या सुमारास उल्हासनगर २ मधील देवऋषी या तळ अधिक पाच मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील कांता मिदवानी यांच्या घरातील हॉलचा स्लॅब तळ मजल्यावर कोसळला. यामध्ये कांता मिदवानी आणि जन्नत मिदवानी या दोघी जखमी झाल्या आहेत. उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान २-फायर वाहन आणि पोलीस कर्मचारी १-रुग्णवाहिकेसह तातडीनं घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले. जखमींना उपचारासाठी स्वस्तिक अँडव्हान्स ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading