कोरोनाच्या काळात पत्रकारांनी बजावलेली भूमिका कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन महापौर नरेश म्हस्के यांनी काल केलं.पत्रकार दिनानिमित्त कोरोनाच्या काळात मृत्यूमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला त्यावेळी महापौर बोलत होते. पत्रकारांनी केलेल्या कामाला तोड नाही असं कौतुक महापौरांनी यावेळी केलं. यावेळी कोरोनाच्या काळात मृत्यूमुखी पडलेल्या ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत नेर्लेकर, प्रशांत कांबळी, विकास काटदरे, अशोक जालनावाला यांच्या कुटुंबियांना खासदार श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या वतीनं प्रत्येकी १ लाख रूपयांच्या मदतीचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.