कोपरी ब्रिजवरील मुंबई नाशिकवाहिनी आज आणि उद्या रात्री सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार

कोपरी ब्रिजवरील मुंबई नाशिकवाहिनी आज आणि उद्या रात्री सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असणार आहे.कोपरी वाहतूक उप विभागाच्या हद्दीत कोपरी रेल्वे ब्रिज (फेज – 2) येथे लोखंडी प्लेट टाकण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून नियोजीत करण्यात आलेले आहे. या कामाच्या दरम्यान आज रात्री ११ ते उद्या सकाळी ६ वाजे पर्यंत कोपरी ब्रिजवरील मुंबई नाशिकवाहिनी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असणार आहे.
त्याचप्रमाणे उद्या रात्री ११ ते  शुक्रवारी सकाळी ६ वाजे पर्यंत कोपरी ब्रिजवरील नाशिक मुंबई वाहिनीवर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असणार आहे.
वाहन चालकांनी त्याप्रमाणे आपल्या प्रवासाचे नियोजन करून उपलब्ध पर्यायी मार्गांचा अवलंब करून वाहतूक पोलीसांना सहकार्य करावे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading