कोपरी पूलाची मुंबईकडील बाजू ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता

कोपरी रेल्वे पूलाची खासदार राजन विचारे यांनी पाहणी केली. गर्दीच्या वेळी सकाळ आणि संध्याकाळी कोपरी पूलाच्या इथे सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हा त्रास कमी व्हावा आणि पूलाचं काम लवकरात लवकर मार्गी लागावं यासाठी खासदार राजन विचारे यांनी ही पाहणी केली. मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण तसंच रेल्वेचे अधिकारी या पाहणी दौ-यात सहभागी झाले होते. मुंबईच्या दिशेनं जाणा-या पूलाचं काम ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करून हा रस्ता वाहतुकीसाठी सज्ज केला जाणार आहे. पूलाचं काम पूर्ण झाल्यानंतर गर्डर बसवण्याचं काम हाती घेतलं जाणार असून ९ महिन्यात हे काम पूर्ण केलं जाणार आहे. वर्षभरात या पूलाचं काम पूर्ण करून या पूलाचं लोकार्पण केलं जाईल असं खासदार राजन विचारे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading