कोपरी- पाचपाखाडी मतदारसंघातील १५० तरूणांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोपरी- पाचपाखाडी मतदारसंघातील लुईसवाडी, अंबिकानगर भागातील सुमारे १५० तरूणानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लुईसवाडी, अंबिका नगर आदी भागात दर्शन महाडिक, ओंकार महाडिक, राकेश चव्हाण, राहुल जगताप, सुमीत जगताप, आकाश भगत, पारस तुपे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे दीडशे तरूण सामाजिक कार्यात आघाडीवर आहेत. या सामाजिक कार्याला दिशा देण्याची क्षमता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्याने या सर्वांनी आज वर्धापन दिनानिमित्त पक्षप्रवेश केला. तरूणांना योग्य दिशा देण्याचे काम शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्यामुळेच या तरूणांना राष्ट्रवादी पक्ष आश्वासक वाटत आहे. तरूणांच्या क्षमतेला योग्य मार्ग दाखविण्याचे काम राष्ट्रवादी करीत आहे. हाच विश्वास कायम ठेऊन तरूण पक्षात आले आहेत असं आनंद परांजपे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading