कोपरीतील धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला – कोणतीही हानी नाही

कोपरीतील चिखलवाडी येथील गायत्री या इमारतीच्या तिस-या मजल्याचा काही भाग आज पडला. तळ अधिक तीन मजल्याची ही इमारत ३५ वर्ष जुनी असून धोकादायक म्हणून खाली करण्यात आली होती. आज सकाळी इमारतीच्या तिस-या मजल्यावरील सज्जाचा काही भाग कोसळल्यानंतर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading