संगीता कुलकर्णी यांना ‘एकता कल्चरल’चा ‘मृणाल गोरे स्मृती’ पुरस्कार

ठाण्यातील सुप्रसिद्ध साहित्यिका, स्तंभलेखिका संगीता कुलकर्णी यांना एकता कल्चरल अकादमीचा साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी 2022-23 सालासाठीचा ‘मृणाल गोरे स्मृती’ पुरस्कार घोषित झाला आहे.
एकता कल्चरल अकादमी ही मुंबईतील नामांकित संस्था असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी सन्मान करीत असते. साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्याना उज्जय आंबेकर पुरस्कृत मधु आंबेकर स्मरणार्थ ‘मृणाल गोरे स्मृती पुरस्कार’ देऊन गौरविले जाते. यंदाचा हा पुरस्कार साहित्यिका संगीता कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. संगीता कुलकर्णी या गेली अनेक वर्षे ठाण्यासह राज्यातील अनेक वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिकांमध्ये लिखाण करीत असून त्यांचे काव्यसंग्रह तसेच ललितबंधही प्रकाशित झाले आहेत. ठाण्यातील अनेक नामवंत संस्थांच्या समितीवरही त्या कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन एकता कल्चरल अकादमीने यंदाच्या ‘मृणाल गोरे स्मृती पुरस्कारा’साठी त्यांची एकमताने निवड केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading