कोकण चषक खुल्या एकांकिका स्पर्धेचं २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी

कोकणातील नव्या कलाकारांना नवीन व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कोकण चषक – २०२३’, मुंबईसह कोकण विभागीय खुली एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी बुधवारी २२ नोव्हेंबर आणि गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी तर अंतिम फेरी शनिवारी १६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती कोकण कला अकादमीचे अध्यक्ष, आमदार संजय केळकर आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ यांनी दिली. कोकण चषकाचे हे १६ वे वर्ष आहे. कोकण चषक – २०२३ मुंबईसह कोकण विभागीय खुली एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी बुधवारी २२ नोव्हेंबर आणि गुरुवारी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी, आनंद विश्व गुरुकुल, लाॅ काॅलेज, येथे होईल आणि शनिवारी १६ डिसेंबर – २०२३ रोजी अंतिम फेरी डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे घेण्यात येईल. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट एकांकिका : प्रथम पारितोषिक रुपये २५,०००/- आणि आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रुपये १५,००० आणि आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक रुपये १०,००० आणि आकर्षक चषक, उत्तेजनार्थ – (२) रुपये ५, ०००/- आणि आकर्षक चषक दिले जाईल. सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष: प्रथम पारितोषिक रुपये २,०००/- आणि आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रुपये १, ५०० आणि आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक रुपये १,००० आणि आकर्षक चषक, उत्तेजनार्थ – रुपये ५००/- आणि आकर्षक चषक दिले जाईल. सर्वोत्कृष्ट अभिनय स्री: प्रथम पारितोषिक रुपये २, ०००/- आणि आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रुपये १,५०० आणिआकर्षक चषक, तृतीय पारितोषिक रुपये १, ००० आणि आकर्षक चषक, उत्तेजनार्थ रुपये ५००/- आणि आकर्षक चषक दिले जाईल. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक रुपये ३, ०००/- आणि आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रुपये २,०००/-, तृतीय पारितोषिक रुपये १,०००/, सर्वोत्कृष्ट लेखक (नवीन संहितेसाठी): पारितोषिक रुपये ३,०००/- आणि आकर्षक चषक, सर्वोत्कृष्ट नेपथ्य: पारितोषिक रुपये ३,०००/- आणि आकर्षक चषक, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत: पारितोषिक रुपये ३,०००/-आणि आकर्षक चषक, सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना: पारितोषिक रुपये ३,०००/- आणि आकर्षक चषक आदी पारितोषिके दिली जाणार आहेत, असे आमदार संजय केळकर आणि प्रा. डाॅ. प्रदीप ढवळ यांनी स्पष्ट केले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading