विश्वहिंदू परिषदेचे नेते शंकर गायकर यांची सरकारवर सडकून टिका

कल्याणात अफजल खानाच्या वध दर्शवणारे बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर पोलिसांनी कारवाई करत ते काढून टाकले. या भूमिकेमुळे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने संताप व्यक्त केला. याबाबत बोलताना गायकर यांनी अफजल खानाच्या वधाचा बॅनर नामर्द सरकारने काढला , त्यांचा बाप लागतो तो ?? पोलीस प्रशासनाने जाऊन मुख्यमंत्र्यांना, सरकारला विचारा अफजलखान आमचा काका मामा लागतो का ? ज्याने आमच्या आया बहिणी पळवल्या तो कोण लागतो? हा शिवरायांचा अपमान आहे. अशी घणाघाती टीका विश्व हिंदू परिषदेचे नेते शंकर गायकर यांनी कल्याणात केली. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला साडेतीनशे वर्षांपूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या शिवशौर्य यात्रे दरम्यान सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत गायकर यांनी शिंदे फडणवीस सरकारसह पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. नवरात्रीत हिंदूंनाच परवानगी मिळावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली, त्यानंतर विरोधी पक्षाने विश्व हिंदू परिषदेवर टीका केली. याबाबत बोलताना शंकर गायकर यांनी गरबा ही देवीची उपासना आहे. नऊ दिवस हिंदू आपल्या आईची उपासना करतो साधना करतो, या साधनेमध्ये अन्य धर्मीय येण्याचं काही कारणच नाही, हा सेक्युलरिझम त्यांनी आपल्या घरी ठेवावा. या सणाला गालबोट लावणं, या सणाला कुठेतरी वाईट दिशेला नेणं आणि हिंदूंची संस्कृती संपवण्याचा जो खुळचटपणा चाललेला आहे, हा बंद झाला पाहिजे, म्हणून बजरंग दलाने अनेक ठिकाणी त्याला प्रतिबंध सुद्धा केलेला आहे. या वेळी बोलताना गायकर यांनी संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली. आमचे प्रधानमंत्री उद्योगधंद्यांचे देवाण-घेवाण करण्याच्या दृष्टीने टांझानियाला जातात, तिथे धर्म आणण्याची गरज नाही ,नवरात्र हा साधनेचा काळ आहे, विश्व हिंदू परिषदेचा मुस्लिम व्यक्तीशी द्वेष नाही, आम्ही संविधानाचा सन्मान करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार आणि सामान्य शिवसेनेच्या अंतर्गत आतापर्यंत छत्रपती आणि हिंदू राष्ट्र बसलेला आहे. यामुळे आजच्या घडीला नेता काही म्हणतात यापेक्षा सामान्य व्यक्ती काय बोलतात याला जास्त महत्व आहे. सामान्य जनता आमच्यासमोर असली पाहिजे त्यांचा प्रबोधन करणं आमचं काम आहे अशी टीका विश्व हिंदू परिषदेचे नेते शंकर गायकर यांनी शिवसेनेसह रावतांवर केली.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading