केंद्रीय अन्वेषण विभागाकडून मनीष सिसोदीया ह्यांना झालेल्या अटकेचा तीव्र निषेध

दिल्लीतील मंत्री मनीष सिसोदीया ह्यांना झालेल्या अटकेच्या तीव्र प्रतिक्रिया देशभर उमटत असून, ठाण्यातील आप च्या कार्यकरर्त्यांनी ठाण्यात निषेध आंदोलन केलं. काल केंद्रीय अन्वेषण विभागाकडून मनीष सिसोदीया ह्यांना झालेल्या अटकेच्या तीव्र निषेध ठाण्यात करण्यात आला. देशाला आर्थिक संकटात टाकणारा, हिंडनबर्गनि उजेडात आणलेला सर्वात मोठ्या अडाणी घोटाळ्या साठी साधी समिती नेमायला तयार नसलेले केंद्र सरकार, गरिबांच्या मुलांना उत्कृष्ट मोफत शिक्षण देणाऱ्या मनीष सिसोदीयांना असंवैधानिक मार्गाने अटक करीत आहे, भाजपच्या हुकूमशाही कृत्याचा निषेध, आता समाजातील सर्वच सुशिक्षित आणी पांढरपेशा वर्गाला सुध्दा राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन, सत्ता परिवर्तन घडवून आणायलाच पाहिजे. मनीष सिसोदीयां सारख्या दिल्ली मध्ये दारूचा काळा बाजार बंद करून, सरकारी महसूल वाढविणाऱ्या मनीष सिसोदीयांना षडयंत्र करून अटक करणाऱ्या हुकूमशहाचा आपच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading