किक बॉक्सिंग राष्ट्रीय स्पर्धेत ठाणे चमकले

किक बॉक्सिंग क्रिडा प्रकारात वाको इंडीया फेडरेशन कप – २०२१ या भारतीय संघासाठीच्या निवड चाचणी स्पर्धेत ठाण्याचे विद्यार्थी चमकले आहेत. उत्तराखंडमधील डेहराडून येथे ७ ते १० फेब्रुवारी या कालावधीत पार पडलेल्या स्पर्धेत महाराष्ट्रसह विविध आठ राज्यातील एक हजाराच्या आसपास स्पर्धक सहभागी झाले होते.किक बॉक्सिंगच्या पॉईंट फाईट आणि लाईट कॉन्टॅक्ट प्रकारात ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयाची रेणुका प्रविण भिरंगी हिने दोन रौप्य पदके पटकावुन ठाण्याचा झेंडा फडकवला आहे.द्वितीय वर्ष सायन्स शाखेत शिकणाऱ्या रेणुका हिला राष्ट्रीय प्रशिक्षक डिफेंडर मार्शल आर्ट संस्थेचे विनोद शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. ठाण्यातल्या परी व्यास,अतुल मिश्रा आणि ऋषिकेश माने यांने सुवर्णपदक आणि कल्पेश निर्गुळकर याने रौप्यपदक पटकावले.एशीयन बोर्ड मेंबर सी.ए.तांबोळी यांच्याहस्ते सर्व विजेत्यांना पदके प्रदान करण्यात आली.महाराष्ट्रातील अन्य स्पर्धकांनी ३० सुवर्णपदके १६ रौप्य आणि ७ कास्यपदके पटकावली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading