कासारवडवली पोलीसांनी सराईत सोनसाखळी चोरट्यांना केलं जेरबंद

कासारवडवली पोलीसांनी सराईत सोनसाखळी चोरट्यांना जेरबंद केलं असून त्यांच्याकडून सव्वा चार लाख रूपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोन महिन्यापूर्वी चार चाकी वाहनानं येऊन एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेण्यात आलं होतं. या प्रकरणाचा तपास सुरू असताना कासारवडवली पोलीसांनी एका दुकलीला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता तीन गुन्हे उघडकीस आले. या दुकलीतील आणखी एका साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीसांनी याप्रकरणी महम्मद खान आणि अब्दुल्ला खान अशा दोघांना जेरबंद केलं आहे. या दोघांकडून तीन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आलं असून यातील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चेन आणि गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा सव्वा चार लाख रूपयांचा ऐवज पोलीसांनी हस्तगत केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading