काल्हेरमधील १ कोटी ८६ लाखाच्या धाडसी दरोडा प्रकरणात एकाला अटक करण्यात पोलीसांना यश

काल्हेर येथे पहाटेच्या सुमारास बंगल्यात घुसून धाडसी दरोडा घालणा-या सहाजणांच्या टोळीतील एकाला अटक करण्यात मालमत्ता आणि मध्यवर्ती गुन्हे कक्षाला यश आलं आहे. काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. काल्हेरमधील जगदिश पाटील यांच्या बंगल्यावर ३० जानेवारीला सकाळी सहाच्या सुमारास शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून दरोडा टाकण्यात आला होता. घरातील व्यक्तींचे हातपाय बांधून बंगल्यातील ६० लाखांची रोकड आणि ४२१ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण १ कोटी ८६ लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला होता. याप्रकरणी मालमत्ता आणि गुन्हे कक्ष पथकातील पोलीस अधिका-यांनी सराईत गुन्हेगारांचा छडा लावून धर्मेश वैष्णव याला अटक केली आहे. त्याच्या चौकशीत त्याने आपल्या सहका-यांच्या मदतीनं ही चोरी केल्याची कबुली दिली असून ४२१ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह १ कोटी २६ लाख रूपयांचा ऐवज पोलीसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणाचा वेळेत तपास करून आरोपींना अटक केल्याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी दोन्ही पथकांना प्रत्येकी २५ हजार रूपयांचं पारितोषिक जाहीर केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading