पोटहिस्सा विभागणी प्रक्रिया झाली सोपी

जमिनीच्या सहधारकांच्या संमतीने आता अभिलेख पोटविभागणी करणं सोपं झालं असून यासाठी कुटुंबातील जमिनीची विभागणी करताना नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी संमतीने अभिलेख पोटहिस्सा या पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे. राज्याचे जमाबंदी आयुक्त एस. चोकलिंगम् यांनी ही प्रक्रिया सोपी केली आहे. पोटहिस्सा विभागणी करण्याकरिता सर्व सहधारकांची स्वाक्षरी असलेला अर्ज, ई-मोजणीद्वारे ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया, भूमापन क्रमांकातील सर्व उपविभागांचे चालू महिन्यातील सातबारे उतारे तसंच धारण जमिनीचे पोटहिस्से दर्शक, सहधारकांची स्वाक्षरी असलेला कच्चा नकाशा, गावनमुना, सातबारा वेगळा झाला असल्यास गावनमुना नंबर ६ ड मधील कच्चा नकाशा, नकाशा उपलब्ध नसल्यास तलाठ्याकडील प्रमाणपत्र तसंच कब्जा वहीवाटीत असलेले अंदाजे क्षेत्र आणि अधिकार, अभिलेखात असलेल्या क्षेत्राचा तपशील, सामुहिक क्षेत्रात विहीर, उपनलिका, वस्ती, झाडे यांचा तपशील देणं आवश्यक आहे. छायाचित्रासह ओळखपत्राची स्वाक्षांकीत छायापत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट यापैकी एक असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्यांना संमतीनं अभिलेख पोटहिस्सा परिपत्रकांचा लाभ घ्यायचा आहे अशा नागरिकांनी संबंधित उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज करावा असं आवाहन जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख अनिल माने यांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading