कांदेनवमी खुशाल साजरी करा, कोरोनाचा आणि कांदेनवमीचा काहीही संबंध नाही – दा. कृ. सोमण

खुशाल साजरी करा कांदेनवमी, कोरोनाचा आणि कांदेनवमीचा काहीही संबंध नाही. कांदाभजी करण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी हात एक मिनिटभर स्वच्छ धुवा असं आवाहन पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी केलं आहे. आज कांदेनवमी असून यानिमित्ताने त्यांनी हे आवाहन केलं आहे. कांदेनवमी ही पंचांग-दिनदर्शिकेत दाखविण्याची पद्धत नाही. परंतू ती अनेक ठिकाणी साजरी केली जाते. या लॉकडाऊनच्या काळात आणि पावसाळ्याच्या प्रारंभी गरमागरम कांदाभजी खाण्याइतके दुसरे सुख नाही. वरती गरम चहा आणि कोरोनायुद्धात गरम चहा तर औषधच आहे असंही सोमण यांनी सांगितलं. आषाढ शुक्ल एकादशी पासून कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंत चतुर्मास असतो. धार्मिक नियमांप्रमाणे चतुर्मासात कांदा, लसूण खाऊ नये असे सांगितले जाते. त्यामागे वैज्ञानिक कारण म्हणजे पावसाळ्यात कांदा-लसूण पोटाच्या आरोग्यासाठी चांगले नसतात. यावर्षी बुधवारी १ जुलै रोजी आषाढी-देवशयनी एकादशी आहे. मध्ये एक दिवसाचे अंतर ठेऊन आषाढ शुक्ल नवमीला कांदेनवमी साजरी केली जाते. सुमारे सात हजार वर्षांपासून कांदे आहारात वापरले जातात. वर्षातून दोनवेळा कांद्याचं पिक घेतले जाते. बाहेरून कांदाभजी आणून खाण्यापेक्षा घरी तयार करणे आरोग्यास जास्त हितकारक असून कांदाभजी खाऊन कांदेनवमी साजरी करा असं आवाहनही सोमण यांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading