कस्टम ऑफीसमधून बोलत असून तुमचे पार्सल आल्याचं सांगून एका व्यक्तीची फसवणूक

एका महिलेने कस्टम ऑफीसमधून बोलत असून तुमचे पार्सल आल्याचं सांगून एका व्यक्तीची फसवणूक केली आहे. पलावा येथे राहणा-या विवेक चव्हाण यांनी जिवनसाथी डॉट कॉम वर नाव नोंदणी केली होती. त्यानंतर गुंगला नावाच्या एका महिलेने त्यांच्याशी व्हॉटस् अॅपवर ओळख करून त्यांना ऑफीसमध्ये प्रमोशन मिळालं असून गिफ्ट मिळणार असल्याचं खोटं सांगितलं. हे पार्सल घेण्यासाठी या महिलेने चव्हाण यांना मोबाईल क्रमांक देऊन त्यावर फोन करण्यास सांगितलं. त्यानंतर या फोनवर कस्टम ऑफीस मधून बोलत आहे असं सांगून गिफ्ट पार्सलच्या क्लिअरन्स आणि जीएसटी साठी चव्हाण यांच्याकडून ३ लाख ४० हजार रूपये बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यास सांगितले. हे पैसे दिल्यानंतर चव्हाण यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading