गजानन महाराजांना सँटाक्लॉजची टोपी घातल्यामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून निषेध

गजानन महाराजांना काल नाताळ निमित्त सँटाक्लॉजची टोपी घातल्यामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. राम मारूती रस्त्यावरील श्री गजानन महाराजांच्या मठात महाराजांना नाताळ निमित्त सँटाक्लॉजची टोपी आणि आरास करण्यात आली होती. ही बाब समजताच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मठात जाऊन मंदिर प्रशासनाला याबाबत जाब विचारला आणि हे योग्य नसून ही टोपी उतरवा असं सांगितलं. त्यानंतर मंदिर प्रशासनाकडून महाराजांना घातलेली सँटाक्लॉजची टोपी काढण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading