कळवा रूग्णालयातील परिचारिकांचं आज काम बंद आंदोलन

ठाणे महापालिकेच्या कळवा रूग्णालयातील परिचारिकांनी आज काम बंद आंदोलन केलं. रूग्णालयामध्ये कर्मचारी वृंद कमी असल्यामुळे हा कर्मचारी वृंद वाढवून मिळावा या मागणीसाठी हे काम बंद आंदोलन करण्यात आलं. कळवा रूग्णालयात आता आयसोलेशन वॉर्ड सुरू केला जाणार आहे. मात्र आहे त्याच वॉर्डसाठी पुरेसा कर्मचारी वृंद नसल्यामुळे कर्मचा-यांची ओढाताण होत आहे. त्यातच काही कर्मचा-यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे कर्मचा-यांचा तुटवडा आहे. कर्मचा-यांची भरती करावी अशी गेल्या दोन वर्षापासूनची मागणी आहे. मात्र प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्यामुळे आता शेवटचा उपाय म्हणून रूग्णालयातील कर्मचारी-परिचारिकांनी हे काम बंद आंदोलन सुरू केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading