कळवा परिसरातील विविध भागांची आयुक्तांनी केली पाहणी

शहरातील स्वच्छता, साफसफाई कामाला प्रथम प्राधान्य देत महापालिका आयुक्तांचा दैनंदिन पाहणी दौरा सुरूच असून आज कळवा परिसरातील विविध भागांना भेटी देवून परिसर सुशोभिकरण, रस्ते दुरुस्ती, गटर्स आणि साफसफाई कामाची पाहणी केली. या परिसरातील फुटपाथची दुरुस्ती, दुभाजकाची दुरुस्ती, मुख्य नाल्याची रुंदी वाढविणे, नालेसफाई आणि रंगरंगोटी वेळेत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आज महापालिका आयुक्तांनी आतकोनेश्वर, घोलाईनगर, शिवाजीनगर, पौंडपाडा तसेच भास्करनगर आदी ठिकाणांची पाहणी केली. शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देत रस्त्यांची नियमित साफसफाई, रस्ते दुरुस्ती, रंगरंगोटी, फुटपाथ साफ ठेवणे आदी कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. यावेळी घोलाईनगर येथे आवश्यकतेनुसार संकल्प चित्र तयार करुन संकुल उभारणीचे काम करणे, घोलाईनगर येथील दोन पाण्याच्या टाक्या १ मे पासून सुरु करणे, पाण्याच्या टाकीचा परिसर रिसफेसिंग करणे आणि कंपाऊंड वॉल बांधणे, घोलाईनगर परिसरातील ठामपा हिंदी माध्यमिक शाळेतील पट विचारात घेता अतिरिक्त वर्ग खोल्या तयार करणे तसेच घोलाईनगर पाण्याच्या टाकीच्या परिसरात अंतर्गत रस्ते तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यासोबतच चिंधी नाला येथील पाण्याचा प्रवाह विचारात घेता, इंदिरानगर येथील काही झोपडयांच्या खालून क्लव्हर्ट तयार करणे, चिंधी नाल्यामधील अर्धवट राहिलेल्या नाल्याचे काम पुर्ण करणे, नाल्यांच्या ज्या भागातून नागरीक कचरा टाकतात त्यांना कचरा टाकण्यापासून परावृत्त करण्याकरीता लोखंडी जाळी लावणे, कळवा प्रभाग समिती परिसरात वन विभागाच्या कायद्यामुळे अडकलेल्या विकास कामांची यादी तयार करणे, साईदर्शन तसेच शिवाजी नगर येथे मध्य रेल्वेमार्फत करावयाच्या मायक्रो टनलिंगचे कामासंबंधी रेल्वे सोबत पाठपुरावा करणे, खारीगाव येथील नागरीकांकरीता नविन आरओबीचा वापर करणेकामी लिफ्टची व्यवस्था करणे तसेच पारसिक येथील दशक्रिया घाट येथे किमान सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading