ओपन डेटा सप्ताह स्पर्धेत देशातील पहिल्या १०मध्ये ठाण्याचा गौरव

भारत सरकारच्या स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या “ओपन डेटा सप्ताह” स्पर्धेत ठाणे स्मार्ट सिटीचा देशातील १०० शहरांमधून पहिल्या १० शहरात समावेश झाला असून स्मार्ट सिटी मिशनचे सह सचिव आणि मिशन संचालक कुणाल कुमार यांच्या हस्ते ठाणे स्मार्ट सिटीचा गौरव करण्यात आला. सुरत येथील समारंभात स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी हा गौरव स्वीकारला. केंद्र शासनाने नागरिकांच्या सूचना घेण्यासाठी ओपन डेटा सप्ताह ही स्पर्धा आयोजित केली होती. त्याअनुषंगाने शासनाच्या ओपन डेटा धोरणाला चालना देण्यासाठी शहरात या ओपन डेटा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून स्मार्ट सिटी ओपन डेटा पोर्टलला समृद्ध करण्यासाठी स्मार्ट सिटीमार्फत दर्जेदार डेटासेट, डेटास्टोरी, ब्लॉग आणि एपीआय अपलोड करण्यात आले होते. ठाणे महापालिकेच्या अन्य विभागांनी स्मार्ट सिटीज ओपन डेटा पोर्टलवर ७० पेक्षा जास्त डेटासेट अपलोड केले होते, ज्याचा सर्व भागधारक, शैक्षणिक किंवा संशोधन संस्था, खाजगी कंपन्या, किंवा ठाणे शहरातील नागरिकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार याचा वापर करण्यास मदत झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading