कळवा खाडीवरील नवीन पुल सप्टेंबर महिन्यात वाहतुकीसाठी होणार खुला

कळवा खाडीवरील नवीन पुल सप्टेंबर महिन्यात वाहतुकीसाठी खुला होईल असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
ठाणे शहर आणि कळवा यांना जोडण्यासाठी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या कळवा खाडीवरील नवीन पुलाचे काम प्रगतिपथावर असून या पुलावरील 100 मीटर मुख्य गर्डर बसविण्याचे काम काल पालकमंत्र्यांच्या हस्ते नारळ फोडून सुरु करण्यात आले. ठाणे आणि कळवा परिसरात होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी ठाणे आणि कळवा यांना जोडला जाणा-या तसेच ठाणे शहरामधून नवी मुंबई, कोकण, पुणे इकडे ठाणे बेलापूर मार्गे जाणाऱ्या वाहनांना ठाणे आणि कळवा दरम्यान खाडीवर सुमारे शंभर वर्षापूर्वीच्या ब्रिटीशकालीन पुलावरून जावे लागते. हा पूल कमकुवत झाल्यामुळे सप्टेंबर २०१० पासून वाहतूकीस बंद करण्यास आला होता. आता नवीन पुलाचे निर्माण करण्यात येत असुन नवीन पुलावर काल गर्डर बसवण्यात आला. हा गर्डर १०० मीटर लांबीचा बास्केट हँडल आकाराचा असून वजन ९५० मेट्रीक टन आहे. लॉचींग करिता बसविण्यात आलेले तात्पुरत्या आधाराचे वजन १०० मे.टन आहे. लवकरच हा पूल वाहतुकीसाठी वापरात येणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. हा महत्वाचा प्रकल्प आहे. तो सप्टेंबर पर्यत पुर्ण होण्याची मुदत आहे त्यामुळे सप्टेंबर महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल असे नियोजन आहे आणि अपेक्षाही या पुलामुळे काल्व्वासियाना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता त्या वाहतूक कोंडीतून आता त्यांची सुटका होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading