कल्याण शीळ रोड वरील प्रीमियर ग्राउंड येथे श्री श्रीनिवास कल्याणम महोत्सवाचे आयोजन

तिरूमला तिरुपती देवस्थान आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने श्री श्रीनिवास कल्याणम महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
डोंबिवली कल्याण शीळ रोड वरील प्रीमियर ग्राउंड येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अनेक नागरिकांना वेळेअभावी, पैसे अभावी तिरुपतीला जाऊन दर्शन घेता येत नाही त्यामुळे नागरिकांना तिरुपती बालाजीचे अनुभूती घेता यावे दर्शन घेता यावे यासाठी या कार्यक्रमाचे डोंबिवलीत आयोजन केले आहे. विदेशात हा कार्यक्रम केला जातो ,यंदा हा मान डोंबिवलीला मिळाला आहे. 25 तारखेला सकाळी साडेसात वाजल्यापासून ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम असणार आहे. त्यामध्ये विविध पूजा, शोभायात्रा, श्रीदेवी आणि भुदेवीचे भगवान स्वामी व्यंकटेश्वरांसोबत दिव्य लग्नाचे अनुभूती भाविकांना घेता येणार आहे. तिरुमला तिरुपती मध्ये ज्या मूर्त्याचे पूजन होते त्याच मुर्त्या डोंबिवलीत आणण्यात येणार आहेत. मिरवणुकीसाठी तिरुमला वरून रथ येणार आहे,पुजारी देखील तिरुपतीहुन येणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी, नावे नोंदवन्यासाठी 7878567567 या क्रमांकावर संपर्क साधावा. या नंबर वर मिस कॉल देऊन कार्यक्रमाची नोंदणी करता येईल.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading