कल्याण रेल्वे स्थानकात खळबळ; एक नंबर प्लॅटफॉर्मवर सापडले 54 डिटोनेटर

कल्याण रेल्वे स्थानकात एक नंबर प्लॅटफॉर्म वर एस्कलेटर शेजारी एका बॉक्समध्ये 54 डिटॉनेटर सापडले आहेत. आज आज दुपारी एका सफाई कामगाराने संशयित बॉक्स असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना स्टेशन वरील प्लॅटफॉर्म नंबर एक वर एक दोन बॉक्स आढळले आहेत. या बॉक्समध्ये डिटोनेटर होते. याबाबत तत्काळ बॉम्बशोधक पथकाला माहिती देण्यात आली. बॉम्ब शोधक पथक ,डॉग स्कॉडने घटनास्थळी धाव घेतली आणि हे डिटोनेतर ताब्यात घेतले आहेत. एकूण 54 डिटोनेटर ताब्यात घेतले असून डिटोनेटर खदानी आणि विहिरीत ब्लास्टिंग करण्यासाठी वापरले जातात मात्र डिटोनेटर याच्यासोबत स्फोट होण्यासाठी स्फोटक आवश्यक असतात त्यामुळे फक्त डिटोनेटर धोकादायक नसल्याचे डीसीपी मनोज पाटील यांनी सांगितले आहे. रेल्वे पोलीस ,बॉम्बशोधक पथक ,कल्याण डीसीपी हे या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांचा मोठा फौज फाटा परिसरात तैनात करण्यात आला आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading