कल्याण रेल्वे स्थानकात महिलांच्या सुरक्षेसाठी महिला मदत कक्ष

कल्याण रेल्वे स्थानकात महिलांच्या सुरक्षेसाठी महिला मदत कक्ष उभारण्यात आले आहे. गेले काही दिवस कल्याण रेल्वे स्थानकात महिलांच्या छेडछाडीच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांना तत्काळ मदत उपलब्ध करून देता यावी यासाठी रेल्वे पोलिसांकडून फलाटावर मदत कक्ष उघडण्यात आले आहेत अशी माहिती कल्याण रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली. महिला प्रवाशांनी गरज पडल्यास तात्काळ या मदत कक्षाशी संपर्क साधावा. या मदत कक्षात 24 तास जीआरपी आणि आरपीएफ चे कर्मचारी उपलब्ध असतील असेही ते म्हणाले. कल्याण रेल्वे स्थानकात गर्दुल्यांकडून महिलांची छेडछाड करण्याबरोबरच महिला प्रवाशांना धक्काबुक्की शिवीगाळ यासारख्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. यानंतर पोलिसांनी धडक मोहीम राबवत स्टेशन परिसर गर्दुल्ला मुक्त करण्याची मोहीम सुरू केली आहे. तर आजपासून कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक वर महिलांसाठी तीन मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या मदत कक्षात आरपीएफ आणि जीआरपीचे कर्मचारी 24 तास उपलब्ध असतील. स्थानकात कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडल्यास आपल्याला पोलिसांकडून मदत मिळेल का अशी कोणती शंका न बाळगता महिलांनी या मदत कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन ढगे यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading