२४ फेब्रुवारीला मलंगड यात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार – श्रीकांत शिंदे

माघी पौर्णिमेला मलंगडावर शिवसेनेकडून मोठा उत्सव साजरा केला जातो. यंदा 24 फेब्रुवारीला मलंगड यात्रा होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात्रे साठी उपस्थित राहणार आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांनी अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड मुक्तीचे आंदोलन सुरू केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून माघी पौर्णिमेनिमित्त मलंगडावर होणाऱ्या मलंग उत्सवात हजारो शिवसैनिक,भाविक सहभागी होत असतात. आता ही चळवळ चालू राहावी आणि मलंग गडाचा हक्क हिंदूंना मिळावा यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. आनंद दिघेनंतर दरवर्षी मुख्यमंत्री माघ पौर्णिमेला मलंग गडावर जाऊन मच्छिंद्र नाथांच्या समाधीचे दर्शन घेतात. मलंगगडावर काल दोन गटांमध्ये वादावादी झाली होती. काही विरोधकांनी घोषणाबाजी देखील केली होती. अशा पद्धतीच्या घोषणा देणाऱ्यांवर त्वरित पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading