कल्याण डोंबिवली शहराच्या इतिहासाला महापालिका देणार उजाळा – कल्याणकरांचा मात्र आक्षेप

कल्याण डोंबिवली शहराच्या इतिहासाला महापालिका उजाळा देणार असून कल्याणकरांनी मात्र याला आक्षेप घेतला आहे. कल्याण शहर हे ऐतिहासिक तर डोंबिवली शहर हे सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखलं जातं. या दोन्ही शहरांचा इतिहास पुस्तक स्वरूपात असावा जेणेकरून नागरिकांना या शहरांची माहिती मिळेल अशी प्रशासनाची इच्छा आहे. मात्र ऐतिहासिक माहिती देणारे पुस्तकं उपलब्ध असताना पुन्हा नवीन पुस्तक प्रकाशित करण्याचा प्रस्ताव अयोग्य असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलं आहे. महापालिका फक्त लाखो रुपये खर्च करते, नागरिकांच्या काय समस्या आहेत ते जाणून घेत नाही. फक्त स्वतःच कौतुक करण्यात पालिकेला स्वारस्य असतं. प्राचीन किंवा हेरिटेज बिल्डिंगचा इतिहास बघायचा झाला तर त्यावर आधीच दोन पुस्तके उपलब्ध आहेत अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी दिली. इतकंच नाही तर सार्वजनिक वाचनालयाने या माहितीची सीडीही काढली असून नव्याने खर्च करण्याची काय गरज आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading