कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बनावट परवानगीचा वापर करून अनधिकृत बांधकाम करणा-या आरोपींना अटक

कल्याण-डोंबिवली महापालिका आणि महारेरा कार्यालयाच्या बनावट परवानगीचा वापर करून अनधिकृत बांधकाम करणा-या आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. कल्याण ग्रामीण परिसरातील बेकायदा बांधकामांसंदर्भात मानपाडा पोलीसांकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिका-यांनी तक्रार नोंदवली होती. पोलीसांनी याबाबत तपास केला असता बनावट परवानगीच्या आधारे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं करण्यात आली असून त्याद्वारे विकास अधिभार बुडवण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यावरून पोलीसांनी मुकुंद दातार, सुनिल मढवी, आशु मुंगेश, रजत राजन आणि राजेश पाटील या ५ जणांना अटक केली आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: