कल्याण डोंबिवली मध्येही आनंद चतुर्दशीच्या दिवशी १७० सार्वजनिक तर 13165 घरगुती गणपती बाप्पांचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन

गणेश चतुर्थी पासून मनोभावे पूजा अर्चा करून अनंत चतुर्थीच्या दिवशी कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक सार्वजनिक मंडळ आणि घरगुती गणपतीचे विसर्जन मोठ्या जल्लोषात झाले असून महा पालिकेकडून गणेश घाटावर त्या संदर्भाची व्यवस्था करण्यात आली होती. कल्याणच्या दुर्गाडी येथील गणेश घाटावर मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि घरगुती गणेशाच्या मूर्तीचा विसर्जन केले जाते. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरून या बाप्पाचा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते. कुठे ढोल ताशांचा गजर तर कुठे गुलालाची उधळण अशा भक्तिमय वातावरणात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत 170 हुन जास्त सार्वजनिक मंडळाचे गणपती तर 13165 घरगुती गणपती बाप्पाचे विसर्जन झाले. यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading