कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी निवडीवरून शिवसेनेत रणकंदन

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी निवडीवरून शिवसेनेत रणकंदन माजलं आहे. कल्याण कृषी उत्पन्न समितीमध्ये शिवसेनेचं बहुमत असतानाही कृषी उत्पन्न समितीचं उपसभापती पद भारतीय जनता पक्षाला दिल्यानं कल्याणमधील शिवसैनिक आणि काही पदाधिका-यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण कृषी उत्पन्न समितीमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता आली असताना सभापती आणि उपसभापती पद दोन्हीही शिवसेनेला मिळणार असतानाच जिल्हा शिवसेनेच्या नेत्यांकडून उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज न दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. हे पद भारतीय जनता पक्षाला सोडण्यात आलं. त्यामुळं संतप्त झालेले काही शिवसैनिक आणि पदाधिका-यांनी कल्याण तालुक्यातील शिवसेना ही महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करेल असं जाहीरपणे भाष्य करून शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या दावणीला पक्ष बांधण्याचा चंग बांधला असल्याचा आरोप या पदाधिका-यांनी केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading