कल्याणमध्ये नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सवाचे शानदार उद्घाटन

ठाणे महिला बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी, तसेच ग्राहकांना थेट त्यांच्यापर्यंत दर्जेदार माल पोहचावा, यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ तर्फे आयोजित नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सव  प्रदर्शनाचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली धाटे यांच्या हस्ते करण्यात आले. वायले मैदान येथे २९ मार्च ते २ एप्रिल या काळात सकाळी १० ते रात्री १० या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

हे प्रदर्शन महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प (नवतेजस्विनी) यांच्या मार्फत आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली धाटे म्हणाल्या की, तुमच्या डोळ्यातून विषमता जात नाही तोपर्यंत समानता येत नाही. स्त्री आणि पुरूष जाती या दोनच आहेत. आम्हाला माणसारखे जगू द्या. आम्हाला वेगळे काही नको. महिला आहोत म्हणजे आम्ही वेगवेगळे नाही. आम्ही तुमच्या सारखे आहोत. या कार्यक्रमामध्ये पन्नास टक्के पुरुष सुद्धा असणे आवश्यक आहे. जेव्हा समानता येईल तेव्हा महिलांना कायदाची गरज भासणार नाही. आपल्या सोबत चालायचे आहे. वेगळेपण नको. महिलांनी रक्षण करण्यासाठी जबाबदारी स्वतः घ्यायला पाहिजे, असेही यावेळी सांगितले.

            महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) माध्यमातून स्वयंसहायता बचत गटांच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक विकास करण्यासाठी,  त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी बचत गटातील सदस्यांना उपजीविकेच्या माध्यमांची संधी निर्माण करणे, तसेच त्यांचे सुरु असलेल्या व्यवसायामध्ये मूल्य वृद्धी करणे, त्याचबरोबर उत्पादित माल विक्रीसाठी विविध स्तरावर प्रयत्न करणे   आणि महिला सक्षमीकरणाशी निगडीत उपक्रमांची अमलबजावणी अधिक विस्तारित स्वरुपात करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

            या महोत्सवामध्ये पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून  यामध्ये व्यवसाय मार्गदर्शन, तृण धान्याचे महत्त्व, सेंद्रीय शेती, डिजिटल मार्केटिंग या विषयावर मार्गदर्शन होणार करण्यात येणार आहे.

            या ग्रामोत्सवात मध्ये ठाणे जिल्ह्यातील बचत गटाचे ३० वेगवेगळ्या वस्तू स्टॉल लावण्यात आले आहेत. या स्टॉल मधून ५०० रुपये खरेदी करणाऱ्या ग्राहकांला लकी ड्रॉ  तिकिट देण्यात येणार आहे. लकी ड्रॉ विजेत्याला पैठणी भेट देण्यात येणार आहे, असे जिल्हा समन्वयक अधिकारी अस्मिता मोहिते यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading