दादोजी  कोंडदेव स्टेडियम परिसरातील वाहतुकीत 4 एप्रिल पर्यंत बदल

ठाणे शहरातील  सिडको क्रिक रोड, शितला माता चौक, दादोजी  कोंडदेव स्टेडियम येथील रस्त खचून मलनिसारण होल्स तुटल्याने त्याची पुर्नबांधणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीत              4 एप्रिल पर्यंत बदल करण्यात आले असल्याची माहिती असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त एस.एस.बुरसे यांनी कळविली आहे.

वाहतूकीतील बदल पुढील प्रमाणे –

        प्रवेश बंद – 1) छत्रपती शिवाजी महाराज चौक कळवा कडून व साकेत रोडने सिडको बसस्टॉपकडे जाणाऱ्या  TMT. NMMT व सर्व प्रकारच्या खाजगी बसेसना क्रिक नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

            पर्यायी मार्ग – सदर बसेस प्रवाशांना  क्रिकनाका येथे सोडतील तसेच तेथूनच प्रवाशांना घेवून इन्छित स्थळी जातील.

            प्रवेश बंद – २) छत्रपती शिवाजी महाराज चौक, कळवा कडून व साकेत रोडने सिडको बस स्टॉपकडे जाणाऱ्या दुवाकी, तीन चाकी चारचाकी वाहनांना शितलामाता चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

        पर्यायी मार्ग – सदरची वाहने माता रमाबाई चौक येथून उजवे वळण घेवून दादोजी कोंडदेव स्टेडियम समोरुन जवाहर बाग व ए वन फर्निचर मार्गे इच्छित स्थळी जातील.

        प्रवेश बंद – 3) सिडको बस स्टॉप कडून ए-वन फर्निचर कडे व मुख्य बाजारपेठ कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना शितलामाता चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

            पर्यायी मार्ग – सदरची वाहने शितलामाता चौक येथून डावे वळण घेवून राघोबा शंकर रोड मार्गे इच्छित स्थळभ्‍ जातील.

            प्रवेश बंद – 4) ए वन फर्निचर व राघोबा शंकर रोड कडून सिडको बस स्टॉपकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना माता रमाबाई चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

            पर्यायी मार्ग – सदरची वाहने जवाहर बाग, अग्निशामक केंद्र येथून उजवे वळण घेवून राघोबा शंकर रोड मार्गे  इच्छित स्थळी जातील.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading