ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील उद्यानामध्ये अभ्यासिका आणि महिलांसाठी सुसज्ज शौचालय

ओवळा-माजिवडा मतदारसंघामध्ये सुमारे १८ उद्यानाचे आरक्षण असून त्यापैकी बहुतांश उद्याने ही महापालिकेने विकसित केलेली आहेत. या सर्व उद्यानांमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत आणि सुसज्ज अशी अभ्यासिका निर्माण करण्याची संकल्पना आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य शासनाकडे मांडली होती. ओवळा-माजिवडा मतदारसंघातील काही दाट लोकवस्तीच्या आणि झोपडपट्टीच्या ठिकाणी प्रामुख्याने घरे लहान असल्याने आणि कुटुंब मोठे असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अड़चणी येत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी सरनाईक यांना केली होती. त्यानुसार महापालिकेच्या सर्व आरक्षित भुखंडावर एका अद्ययावत अभ्यासिकेची निर्मिती करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी, पुस्तके ठेवण्यासाठी जागा, लाईट व्यवस्था, पाण्याची व्यवस्था तसेच शौचालयाची व्यवस्था करण्यात येणार आहे. जेणेकरून शांत निर्सगाच्या सान्निध्यामध्ये रात्री १० वाजेपर्यंत सुविधांचा मोफत लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक उद्यानामध्ये महिलांसाठी अद्ययावत आणि सुसज्ज अश्या वातानुकुलीत शौचालयांची निर्मिती करून या शौचालयांमध्ये महिलांसाठी स्तनपानासाठी खोली, लहान बाळांना डायपर बदलणे तसेच त्यांच्या आंघोळीसाठी एक खोली अश्या प्रकारची सोय करण्यात येणार आहे. जेणेकरून महिलांना महापालिकेच्या कुठल्याही उद्यानामध्ये जाऊन या सुविधांचा लाभ घेता येईल. महिलांसाठी अशी सुविधा नसल्याने आमदार सरनाईक यांनी याबाबत नगरविकास विभागाकडे मागणी केली होती. त्यांची ही मागणी मान्य करून
महापालिकेसाठी २५ कोटी निधी मंजूर केला असून त्यापैकी ५ कोटी रूपये निधी ठाणे महापालिकेला वर्गही केला आहे. तसेच सर्व शौचालय आणि वाचनालय बांधणा-या ठेकेदाराच्या माध्यमातून त्याची निगा देखभाल करण्यात येणार असून लवकरच या कामाला सुरूवात होणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading