ए. के. जोशी इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे शिवाजी महाराजांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी छोटेखानी प्रदर्शन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं ए. के. जोशी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शिक्षकांनी शिवाजी महाराजांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी एक छोटेखानी प्रदर्शन भरवलं होतं. भूतकाळात केलेले प्रयत्न आणि वर्तमानकाळात दाखवलेले धैर्य आपला भविष्यकाळ उज्वल बनवतात या उक्तीनुसार ए. के. जोशी इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून काही उपक्रम शाळेत राबवले आहेत. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनात शिवाजी महाराजांचं छायाचित्र, जिरेटोप, शस्त्रास्त्रं, खलिता आणि दरबारी पत्रांचे प्रतिकात्मक प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. जिवा काशिद या वीरपुरूषाच्या बलिदानाची गोष्ट यावेळी विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी २ मिनिटांचं मौन पाळलं होतं. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, आपल्या जवानांसाठी योग्य सन्मान, देशासाठी सर्वस्व अर्पण करणा-या वीरपुरूषांप्रती आदर निर्माण करणारे असे विविध उपक्रम शाळेतर्फे राबवले जातात.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading