एसी लोकलला चांगला प्रतिसाद – प्रवाशांच्या संख्येत वाढ

गेल्या सहा महिन्यात ठाणे, डोंबिवली आणि कल्याणच्या प्रवाश्यांना वातानुकूलीत लोकल मुळे सुरक्षित आरामदायी आणि सुखकर प्रवास लाभला आहे. गेल्या सहा महिन्यांत वातानुकूलित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फेब्रुवारी मधील दैनंदिन सरासरी 5 हजार 939 प्रवाशांवरून ऑगस्टमध्ये 41 हजार 333 प्रवासी इतकी वाढली आहे. म्हणजेच, जवळपास 7 पटीने वाढली आहे. सध्या,मध्य रेल्वे 56 वातानुकूलित लोकलसह एकूण 1810 उपनगरीय सेवा चालवते. फेब्रुवारी 2022 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत ठाणे स्थानकात 10,50,511 डोंबिवली 9,39,431 आणि कल्याणमध्ये 9,01,859 प्रवासी इतकी आहे. मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास देण्याच्या प्रयत्नांमध्ये आघाडीवर आहे आणि वातानुकूलित लोकल चालवणे ही त्यापैकी एक आहे. वातानुकूलित लोकलला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे प्रवाशांना सर्वोत्तम सेवा देण्याच्या मध्य रेल्वे च्या प्रयत्नांना चालना मिळाली आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading