गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात काल ५ दिवसांच्या गणपतींना भक्तीभावपूर्ण निरोप

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात काल ५ दिवसांच्या गणपतींना भक्तीभावपूर्ण निरोप देण्यात आला.

ठाणे महापालिका क्षेत्रात काल ५ दिवसांच्या एकूण ३ हजार ७६० गणपतींचं जल्लोषात, वाजत गाजत विसर्जन झालं. यामध्ये ३ हजार ७०२ घरगुती गणेश मूर्ती तर २९ सार्वजनिक गणपतींचं विसर्जन करण्यात आलं. महापालिकेने केलेल्या कृत्रिम तलावात दत्तमंदिर घाट येथे १७३ घरगुती गणपतींचं विसर्जन झालं. अहिल्यादेवी घाट ४६, खारेगाव तलाव १७७, मिठबंदर घाट, १११, आंबेघोसाळे तलाव १०२, रायलादेवी घाट१ – १५८, घाट२- ४३० घरगुती तर १ सार्वजनिक गणेशमूर्ती, कोलशेत घाट – ४२२ घरगुती तर ११ सार्वजनिक, रेवाळे तलाव ९१, गायमुख घाट ३२३ घरगुती तर ४ सार्वजनिक, खिडकाळी तलाव ८५ घरगुती तर २ सार्वजनिक, दिवा-गणेश घाट ३८९ घरगुती, पारसिक रेतीबंदर २०५ घरगुती तर ५ सार्वजनिक, आत्माराम घाट ३ घरगुती, शंकर मंदिर तलाव ६ घरगुती गणपती, निळकंठ वूडस् ३१४ घरगुती आणि ६ सार्वजनिक तर उपवन तलाव येथे ६६७ घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading