एक कोटींचा बनावटी विदेशी मद्यसाठा ठाणे भरारी पथकाने केला जप्त

महाराष्ट्रात विक्रीस परवानगी नसलेला एक कोटीचा गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाने जप्त केला आहे. विदेशी मद्याचे १५५७ बॉक्स भरलेल्या कंटेनरसह कंटेनर चालक राजशेखर परगी आणि त्याचा साथीदार ख्वाजा हित्तलमनी या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क अधिक्षक निलेश सांगडे यांच्या निर्देशानुसार निरिक्षक दिगंबर शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई – गोवा महामार्गावरील पनवेल कल्हेगाव येथील हॉटेल विसावाजवळ करण्यात आली. याप्रकरणी पोलीसांनी एकूण १ कोटी १८ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading