ठाणे शहरातील संकल्प चौक ते जुना पासपोर्ट मार्गावरील वाहतुकीत बदल

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील संकल्प चौक ते जुना पासपोर्ट ऑफिसकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जिलानेवाडी येथील श्री रायलादेवी महादेव मंदिरा समोरील मुख्य रस्त्यावर मलवाहिनी  टाकण्यात येणार आहे. त्यामुळे आज दि. २ जूनपासून काम संपेपर्यंतच्या कालावधीत संकल्प चौकातून जुना पासपोर्ट ऑफिसकडे जाणाऱ्या वाहनांना व जुना पासपोर्ट ऑफिसकडून संकल्प चौकाकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. या परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उपआयुक्त डॉ. विनयकुमार  राठोड यांनी दिली आहे.

वाहतुकीत बदल पुढील प्रमाणे

            प्रवेश बंद  जुना पासपोर्ट ऑफिस कडून संकल्प चौक कडे येणाऱ्या वाहनांना जिलानेवाडी चौक अर्जुन पार्क सोसायटी येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

            पर्यायी मार्ग – सदरची वाहने जिलानेवादी चौक अर्जुन पार्क सोसायटी येथून डावे वळण घेवून हाजुरीकडे जाणाऱ्या रोडने संजय गांधी चौक येथून उजवे वळण घेवून इच्छीत स्थळी जातील.

            प्रवेश बंद – रघुनाथनगर हाजुरी व रहेजा चौक कडून संकल्प चौक येथून जुना पासपोर्ट ऑफिस कडे जाणाऱ्या वाहनांना संकल्प चौक येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे

            पर्यायी मार्ग  १) सदर वाहने संकल्प चौकातून डावे वळण घेवून रहेजा चौक, मांडेला चेकनाका मार्गे इच्छित स्थळी जातील. २) तसेच रहेजाकडून संकल्प चौक येथून जुना पासपोर्ट ऑफिस कडे जाणारी वाहने संकल्प चौक येथून सरळ ऑडी कार शोरूम, हाजूरी सर्कल, महावीर हॉस्पिटल, हाजूरी शिवसेना शाखा येथून इच्छीत स्थळी जातील.

३) हाजूरी कडून संकल्प चौक, जुना पासपोर्ट ऑफिस कडे जाणारी वाहने संकल्प चौक येथून सरळ रहेजा चौक, मॉडेला चेकनाकाकडून इच्छित स्थळी जातील.

4) जिलानेवाडी परिसरात राहणाऱ्या रहिवाशांचे दुचाकी वाहनांना प्रवेश राहणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading