एका शाखा प्रमुखामुळे वाचला महिलेचा जीव

आत्महत्या करण्यास निघालेल्या एका महिलेचा जीव शिवसेनेच्या एका शाखा प्रमुखामुळे वाचला. पाचपाखाडी शिवसेना शाखेच्या मागे असलेल्या रायगड गल्लीत सरोवर दर्शन इमारतीत गुलमोहर ९ मध्ये राहणारी सरीता गायकवाड ही घरातल्या भांडणाला कंटाळून आत्महत्या करायला निघाली होती. यासाठी ती जवळच्याच पंकज इमारतीच्या गच्चीवर जाऊन उडी मारण्याचा प्रयत्न करत होती. याचवेळी शेजारी निशिगंधा इमारतीत राहणा-या मनोज पवार यांच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांनी गच्चीवरून इमारतीच्या सज्जावर उतरून स्वत:चा जीव धोक्यात टाकत सरीता गायकवाड यांचे प्राण वाचवले. अग्निशमन दलानेही गायकवाड यांचा प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. मनोज पवार यांनी प्रसंगावधान राखत या महिलेला सुखरूप बाहेर काढलं. त्यानंतर सरीता गायकवाड यांना कौशल्य रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मनोज पवार यांच्या धाडसाचं कौतुक होत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading