शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांना पत्नीशोक झाला आहे. ठाण्याचे माजी महापौर सतीश प्रधान यांच्या पत्नी प्रतिभा प्रधान यांचं अल्पशा आजारानं दुपारी निधन झालं. त्या ७२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती, मुलं, सुना, नातवंडं असा परिवार आहे. आज रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.