एका पक्षीमित्रानं वाचवला लिजर व्हिसलिंग डक या दुर्मिळ पक्ष्याचा जीव

लिजर व्हिसलिंग डक या दुर्मिळ पक्ष्याचा जीव एका पक्षीमित्रानं वाचवला आहे. लिजर व्हिसलिंग डक हा पक्षी जखमी झाला होता. त्याच्या पंखाला जखम झाल्यामुळं तो उपवन परिसरात पडला होता. त्याला पक्षी मित्र पराग शिंदे यांनी वाचवलं. या लिजर व्हिसलिंग डकच्या पंखाला छोटीशी जखम झाली होती. त्यामुळं त्याच्या उडण्यावर काही बंधनं आली होती. पराग शिंदे यांनी त्याच्यावर उपचार करून त्याचा जीव वाचवला. हा पक्षी स्थलांतरीत पक्षी आहे. तो थव्यानेच राहतो. मात्र जखमी झाल्यामुळे तो थव्यांपासून वेगळा झाला होता. या पक्ष्यावर उपचार करून नंतर त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading