सेलिब्रिटींच्या खात्यांना लाईक आणि जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून तरूणाची ३७ लाखांची फसवणूक

सोशल मिडीयावरील सेलिब्रिटींच्या खात्यांना लाईक करण्याबरोबरच क्रिप्टो करन्सीच्या प्रीपेड टास्क प्लानमध्ये पैशाची गुंतवणूक करून जास्त परतावा मिळण्याचे प्रलोभन दाखवून एका तरूणाची तब्बल ३७ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. डायघर परिसरात राहणार हा तरूण नोकरीच्या शोधात होता. त्याला नोकरीसंदर्भात मेसेज आल्यानंतर त्याने चौकशी केली असता एका मीरा नामक महिलेने इन्स्टाग्रामवर सेलिब्रिटींच्या खात्यांना लाईक केल्यास प्रत्येक लाईकमागे ७० रूपये देण्यात येतील असं सांगितलं. त्यानंतर त्याला क्रिप्टो करन्सी विकत घेऊन खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्यास जास्त परतावा मिळण्याचे आमिष दाखवण्यात आले. हळूहळू गुंतवणूकाचे टास्क देत या तरूणाकडून पैसे उकळण्यात येत होते. परंतु परतावा मिळण्याचे बंद झाल्याने या तरूणाला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. याप्रकरणी ४ जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading