एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर ठाण्यात जल्लोष

एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदावर झालेल्या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी मोठा जल्लोष केला. एकनाथ शिंदे यांचा निवासस्थान लुईस वाडी परिसरात आहे. काल रात्री शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे समर्थकांनी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केली. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री पद मिळाल्याबद्दल ठाण्यातही आनंद व्यक्त करण्यात आला. ठिकठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदी झालेल्या निवडीबाबत चर्चा ऐकू येत होती. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने ठाण्याला प्रथमच मुख्यमंत्री पद मिळाला आहे, त्यामुळे आता खाण्याचा मोठा विकास होईल अशी आशा ठाणेकरांना आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading